टोल फ्री नंबर - 1800-22-1978

 

mpbcdc

सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभाग

mpbcdc

कर्ज अनुदान योजना

या योजनेअंतर्गत रु.50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणा-या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये रु.10,000/- पर्यंत किंवा 50% अनुदान महामंडळाकडून व 50% रक्कम कर्जरुपाने राष्ट्रीयीकृत बँकेकडून दिली जाते.

सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 5,51,297 लाभार्थ्यांना रु. 26,278.87 लाख इतका लाभ देण्यात आलेला असून सन 2016-17 मध्ये विभागनिहाय लाभधारकांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

बीज भांडवल योजना

या योजनेअंतर्गत रु.5 लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात. महामंडळाकडून 20% बीज भांडवल रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. प्रकल्प रकमेच्या 5% रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून अर्जदाराने भरावयाची आहे. उर्वरित 75% रक्कम ही बँकेकडून मंजूर केली जाते. महामंडळाकडून मंजूर केलेल्या बीज भांडवल रकमेवर 4% व्याजाचा दर आकारला जातो. तसेच महामंडळामार्फत रु.10,000/- चे अनुदान देण्यात येते.

सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 81879 लाभार्थ्यांना रु. 12045.49 लाख इतका लाभ देण्यात आलेला असून सन 2016-17 मध्ये विभागनिहाय लाभधारकांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

प्रशिक्षण योजना

सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याचे द्दष्टीने प्रशिक्षण दिले जाते. साधारणपणे प्रशिक्षण फी प्रति उमेदवार व्यवसायाच्या स्वरुपानुसार ठरविण्यांत येते. प्रामुख्याने खालील व्यवसायाकरीता प्रशिक्षण देण्यांत येते.

उदा.वाहनचालक, टी.व्ही.व्हीडीओ, रेडीओ दुरुस्ती, टेलरिंग, वेल्डींग, फिटर, संगणक, ई मेल व विविध व्यवसायनुरुप प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना दरमहा रु. 1000/- विद्यावेतन देण्यांत येते. तसेच महामंडळामार्फत प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण फी दिली जाते.

सन 1978 ते जानेवारी 2017 पर्यंत एकूण 61200 प्रशिक्षणार्थींना रु. 2085.69 लाख इतका लाभ देण्यात आलेला असून सन 2016-17 मध्ये विभागनिहाय प्रशिक्षणार्थींची संख्या खालीलप्रमाणे आहे.


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची रु. १,००,००० ची
थेट कर्ज योजना

ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख दिनांक ७ जानेवारी २०१९ पासून
२५ जानेवारी २०१९ पर्यंत कार्यालयीन वेळेत.

विनामूल्य सल्ला विनंती



फॉर्म भरण्या ची प्रक्रिया

अर्जदाराने फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरणा आवश्यक आहे. अथवा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.

फॉर्म भरल्या नंतर सबमिट करून अर्जदाराने PDF फाईल डाउन्लोड कर्ण आवश्यक आहे. PDF मध्ये असलेला अजजदाराचा फोटो हा अर्जदाराशी निगडित असला पाहिजे अथवा अर्ज कार्यालयात स्वीकारला जाणार नाही.

फॉर्म भरल्या नंतर अर्जदाराने १५ दिवसाच्या आत कार्यालयात संपर्क करून ओरीजिनल दस्तावेज दाखवणं आवश्यक आहे. अथवा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.

आमच्या वेब्सिते व मोबाईल अँप मधून अर्जदार आपला अँप्लिकेशन स्टेटस आहे तपासू शकतो. त्यासाठी अँप डाउनलोड कर्ण आवश्यक आहे.