टोल फ्री नंबर - 1800-22-1978

 

सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभाग

महामंडळ राबवित असलेल्या केंद्रीय महामंडळाच्या योजना

सन १९९१-९२ पासून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती व विकास महामंडळ, नवी दिल्ली (एन एस एफ डी सी) यांच्या "वाहिनीकृत यंत्रणा" म्हणून योजना राबवित आहे.

सन १९९७-९८ पासून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राष्ट्रीय सफाई कर्मचारी वितीय आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (एन एस एफ डी सी) यांच्या "वाहिनीकृत यंत्रणा" म्हणून योजना राबवित आहे.

सध्या उपरोक्त दोन्हीही महामंडळाकडून अनुसूचित व नवबोध जातीतील ज्या कुटुंबाचे ग्रामीण भागामध्ये वार्षिक उत्पन्न रुपये ८१,०००/- व शहरी भागामध्ये उत्पन्न रुपये १,०२,०००/- चे आत आहे अश्याना व्यवसायासाठी कर्ज उपलबध करून दिले जाते. याकरिता व्याजदर ६ ते ८ टक्के आकारले जातो. रु. ५. लाखापर्यंत ६ टक्के व रु. ५ लाखावर ८ टक्के व्याजदर आकारला जातो.

राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती वित विकास महामंडळ.
नवी दिल्ली (एन एस के एफ डी सी) मार्फत

  1. मुदत कर्ज
  2. मायक्रो क्रेडिट फायनान्स
  3. महिला समृद्धी योजना
  4. उच्च शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी वितीय विकास महामंडळ.
नवी दिल्ली (एन एस एफ डी सी) मार्फत

  1. मुदत कर्ज
  2. मायक्रो क्रेडिट फायनान्स
  3. महिला समृद्धी योजना
  4. महिला अधिकारी योजना
  5. उच्च शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.

एनएसएफडीसी योजना

एनएसएफडीसीची स्थापना शासनाकडून करण्यात आली. 8 फेब्रुवारी 1 9 8 9 रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती वित्त व विकास महामंडळ (एनएससीएसटीडीएफडीसी) या नावाने भारताच्या स्वाधीन करण्यात आले. कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत कंपनीची पूर्ण स्वामित्व वाली सरकारी कंपनी म्हणून ही कंपनी स्थापन करण्यात आली (कंपनी अधिनियम, 1 9 56 च्या आधीच्या कलम 25).

विनामूल्य सल्ला विनंतीफॉर्म भरण्या ची प्रक्रिया

अर्जदाराने फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरणा आवश्यक आहे. अथवा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.

फॉर्म भरल्या नंतर सबमिट करून अर्जदाराने PDF फाईल डाउन्लोड कर्ण आवश्यक आहे. PDF मध्ये असलेला अजजदाराचा फोटो हा अर्जदाराशी निगडित असला पाहिजे अथवा अर्ज कार्यालयात स्वीकारला जाणार नाही.

फॉर्म भरल्या नंतर अर्जदाराने १५ दिवसाच्या आत कार्यालयात संपर्क करून ओरीजिनल दस्तावेज दाखवणं आवश्यक आहे. अथवा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.

आमच्या वेब्सिते व मोबाईल अँप मधून अर्जदार आपला अँप्लिकेशन स्टेटस आहे तपासू शकतो. त्यासाठी अँप डाउनलोड कर्ण आवश्यक आहे.