NSFDC Scheme | MPBCDC


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या (NSFDC)
सवलतीच्या व्याजदराने व्यवसाय कर्ज योजना (२०१९)

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाकडुन मिळणाऱ्या कर्ज निधीतून या महामंडळाच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी सवलतीच्या व्याजदराने व्यवसाय कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांना ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे. त्यासाठी त्या त्या गटातील तरतूदी नुसार महामंडळाचे www.mahatmaphulecorporation.com/nsfdc संकेत स्थळावर Online पद्धतीने अर्ज करावेत. या योजनेच्या अटी, शर्ती व इतर आवश्यक कागदपत्राची सुची उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

फक्त अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील व्यक्तीं साठी (Only for Scheduled Caste & Nauboudha)

योजना संक्षिप्त माहिती

  • दिनांक 11 मार्च, 2019 पासून दिनांक 30 मार्च, 2019 या कालावधीत या संकेत स्थळावर Online पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.
  • अर्जदाराना Online अर्ज करणे शक्य नसल्यास विहित नमुन्यातील अर्ज व वैयक्तिक कागदपत्रे स्वयं साक्षांकित करुन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात रजिस्टर ए.डी. टपालाने पाठवावेत किंवा जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात समक्ष दाखल करु शकतील.
  • ज्यांनी यापुर्वी या महामंडळाच्या अथवा केंद्रीय महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेतला नाही त्या सर्वांना अर्ज करता येतील.
  • ऑनलाईन अर्जासोबत फक्त वैयक्तिक माहितीची फक्त (8) कागदपत्राच्या प्रती दाखल करावयाच्या आहेत. ((i) जात प्रमाणपत्र, (ii)आधार कार्ड, (iii) पॅन कार्ड, (iv) उत्पन्न दाखला, (v)शिधा पत्रिका, (vi) प्रकल्प अहवाल (vii) प्रशिक्षण प्रमाणपत्र (viii) व्यवसायाच्या जागेचा पुरावा.
  • जामीनदार, साक्षीदार, शपथपत्रे, व्यवसाय परवाने, मालमत्ता गहाणपत्र, कर्ज परत फेड शपथपत्र, विक्रेत्याचे दरपत्रक इ. पुराव्यांच्या कागदपत्राच्या प्रती केंद्रीय महामंडळाकडुन LOI मंजुरी व निधी उपलब्ध झाल्यानंतर व मुख्य कार्यालयाच्या आदेशानंतर प्रत्यक्ष कर्ज वाटपाचे वेळी दाखल कराव्या लागतील.
  • अर्जदाराने हमीशुल्क, स्वहिस्सा रक्कम अथवा इतर कोणतेही शुल्क रक्कम अर्जा सोबत महामंडळास भरणा करावयाची नाही. मात्र NSFDC कडुन कर्ज मंजुरी व निधी उपलब्धी नंतर मुख्य कार्यालयाच्या आदेशानंतर प्रत्यक्ष कर्ज वाटपाचे वेळी महामंडळास Online भरणे आवश्यक आहे.
  • कर्ज मंजुरीची कार्यपद्धती संपुर्णपणे पारदर्शी पद्धतीने असल्याने अर्जदारानी दलाल, मध्यस्थ अथवा अनाधिकृत व्यक्तींशी संपर्क करु नये.
  • माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. तेथे अर्जाचा नमुना व कागदपत्राची सुचि उपलब्ध आहे.
  • Business List

    3 Lakh Scheme 4 Lakh Scheme 5 Lakh Scheme
    1. Honey Bee Cultivation 1. Floriculture 1. Mini Tractors 14. Event Management -
    Decorators & Suppliers
    2. Soft Toys Making 2. Hatcheries 2. Power Tillers 15. Chemist Shop
    3. Bakery 3. Horticulture 3. Poultry 16. Steel Fabrication
    4. Handicraft Making 4. Floor Mill 4. Dairy 17. Computer Center
    5. Silver Ornaments Making 5. Grinding Machine
    (Chilli & Turmeric Powder Processing)
    5. Piggery 18. Tyre Servicing
    6. Candle Manufacturing 6. Food Processing 6. Goatery 19. Departmental Store
    7. Ready Made Garments 7. Furniture Making 7. Ship Farming 20. Electric Item Servicing
    8. Cloths Bags Manufacturing 8. Oil Mill 8. Automobile Repairs 21. Loundry & Dry Cleaning Shop
    9. Hosiery Unit 9. Printing & Laminating 9. Electrical Items Shop
    10. Tailoring 10. Spray Painting 10. Hardware Shop
    11. Potteries 11. Nursery School 11. Internet Cyber Cafe
    12. Public Address System 12. Refrigeration repairs 12. Digital Mixing Lab
    13. Bangels & Cosmetics Shop 13. Ladies Beauty Parlour 13. Band Party
    14. Cloth merchants ( all kinds of Sarees,
    Women garments, Plain clothes etc )

खाली नमूद कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रती ३० मार्च २०१९ च्या आत व्यक्तिशः जिल्हा कार्यालयात दाखल कराव्यात.

अर्जदाराची वैयक्तिक माहितीची कागदपत्रे (सदर कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.)
१. जात प्रमाणपत्र (उपजिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त) २. उत्पन्नाचा दाखला(सेतू /तहसील कार्यालयातून प्राप्त)
३. आधार कार्ड ची प्रत ४. पॅन कार्ड ची प्रत
५. शिधापत्रिकेची प्रत (पुढील व माघील बाजू) ६. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
७. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, असल्यास त्याची प्रत ८. व्यवसायाच्या जागेचा पुरावा (स्वतःची /भाडेतत्त्वावरील)

NSFDC कडून कर्ज मंजुरी नंतर खाली नमूद कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रती व्यक्तिशः जिल्हा कार्यालयात दाखल कराव्यात .

१. कर्ज परतफेडीचे शपथपत्र (विहित नमुन्यातील)
कर्ज परतफेडीचे शपथपत्र चा विहित नमुना डाउनलोड करा
२. व्यवसायाचे अनिवार्यते नुसार लायसन्स (असल्यास)
३. विक्रेत्याचे दरपत्रक
जामीनदाराचे कागदपत्रे:
१. जामीनदारचे आधार कार्ड २. जामीनदारचे पॅन कार्ड
३. जामीनदारचे हमीपत्र (विहित नमुन्यातील) ४. जामीनदाराचे आयकर परतावा (इनकम टॅक्स रिटर्न्स) प्रमाणपत्र अथवा शेतकरी असल्यास
7/12 उतारा किंवा कोणत्याही संस्थेचा नोकरदाराचे वेतन प्रमाणपत्राची प्रत
साक्षीदाराचे कागदपत्रे:
१. साक्षीदाराचे आधार कार्ड २. साक्षीदाराचे पॅन कार्ड




ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याबाबत चा विडिओ :-

महत्वाची सूचना:

1) ₹ ३ लक्ष, ४ लक्ष, व ५ लक्ष कर्ज योजनेर्गंत कोणत्याही फक्त एकाच रकमेच्या गटातील व्यवसाया साठी अर्ज करता येईल अर्ज भरणे पुर्वीच कर्ज रक्कम गट व व्यवसाय निवडून नंतरच अर्ज भरावा

2) महात्माफुले महामंडळ द्वारे फक्त MPBCDC ह्याच सेंडर आयडी मार्फत SMS केले जातील. अन्य कोणत्या हि SMS ला महामंडळ जबाबदार नाही

3) थेट कर्ज योजने अंतर्गत तुमचे नाव लॉटरी प्रणाली मध्ये आलेले असल्यास तुम्हाला NSFDC योजनेचा लाभ घेता येणार नाही. कृपया कार्यालयात संपर्क करावे.

4) थेट कर्ज योजने अंतर्गत तुम्ही आधी फॉर्म व स्कॅन डोकमेंट्स भरलेला असल्यास तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरणे आवश्यक नाही. कृपया जबाब्दारीने संपूर्ण माहिती तपासावे व बदलावे.
स्कॅन डोकमेंट्स उपलोंडेड असल्यास परत अपलोड करू नये.














Need Help?
Website: www.mahatmaphulecorporation.com
Email: mpbcdc@mtnl.net.in, info@mahatmaphulecorporation.com | Call Toll Free: 1800-22-1978
Address:
Shop No.25/2, JVPD Scheme, Juhu, Mumbai, Maharashtra 400049

Copyrights @ 2018-19 | Mahatma Phule Corporation, Mumbai

Managed by Densder Web Services Private Limited

Comodo Trusted Site Seal Internet Accredited Business - Click For Ratings